किंजळघर येथील तीन कुटुंबाचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी तहसीलदारांनी स्वत: जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. कोकणात आज पावसानं उसंत घेतली होती.

हायलाइट्स:
- मंडणगड किंजळघर येथे दरड कोसळली
- तीन कुटुंबातील १६ जण बचावले
- प्रशासनाकडून तात्काळ स्थलांतर
शुक्रवारी आठ जुलै रोजी ही घटना समजताच मंडणगड तहसीलदार तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता सकपाळे व महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली व कुटुंबाला धीर दिला.
नांदेड येथील भक्ताकडून विठ्ठल रखुमाईसाठी कोट्यवधीचे सुवर्णमुकुट, आषाढी एकादशीला अर्पण करणार
तस्लिम अयुब ओंबिलकर यांच्या कुटुंबातील ६ सदस्य,हसमत महमद शेख यांच्या कुटुंबातील ३, तन्वीर अयुब ओंबीलकर यांच्या कुटुंबातील ७ अशा एकूण १६ नागरीकांना सहकार्य करत यांची व्यवस्था एका शाळेत करण्यात आली होती. पण, ही सगळी तीनही कुटूंब नातेवाईक जवळच असल्याने तात्पुरते नातेवाईकांकडे शिफ्ट झाली आहेत. त्यांना सध्या पावसाळ्याच्या दिवसात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करणेसाठी सुचना तसेच नोटीसा देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रगीतानं दिंडीची सुरुवात, राष्ट्रभक्तीचा जागर,लोहसरच्या वारकऱ्यांची अनोखी दिंडी
मौजे किंजळघर येथे असलेल्या डोंगराला चालू अतिवृष्टीमुळे भेगा पडल्यामुळे या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे तातडीने या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान या काळात या कुटूंबांना आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडुन केले जाईल अशी ग्वाही यावेळी प्रशासनाकडुन देण्यात आली. या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जिल्हाप्रशासनाला देण्यात आला आहे.
कुडावळे तेली वाडी ते काटकर वाडी साकव कोसळला
इकडे दापोली तालुक्यातील कुडावळे तेली वाडी ते काटकर वाडी जाणारा पूल साकव बुधवारी रात्री कोसळला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला त्याबाबत कळवणेत आलेले असून हा साकव जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे. याचाही पंचनामा संबंधित विभागाकडुन करण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने दाभोळ जवळील भाटी येथील पार्वती महादेव लवंदे यांच्या घराची पडवी पडून घराचे अंशतः नुकसान झालेले आहे. तसेच दापोली शहरात युसुफ हमीद फकीर, कॅम्प दापोली यांची जुन्या बंद घराची भिंत पडलेने बारा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त घटनांचे पंचनामे तहसीलदार वैशाली पाटील यांच्या प्राशासनाकडून करण्यात आले आहेत.
आंध्र प्रदेशच्या राजकारणात नवा ट्विस्ट, जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा पक्षाचा राजीनामा
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times