मुंबई : गुरू दत्त यांचं नुसतं नाव समोर आलं की त्यांचे एकापेक्षा एक एव्हरग्रीन सिनेमे आठवतात. हम एक है, काला बाझार, प्यासा, आरपार… जितकी नावं घेऊ तितकी कमीच. पण गुरू दत्त यांच्या बरोबर एक नाव कायम जोडलं गेलं. ते म्हणजे वहिदा रेहमान. दोघांची प्रेमकहाणी आजही चर्चिली जाते. पण ही प्रेमकहाणी अधुरीच राहिली.

गुरू दत्त यांचं लग्न झालं होतं त्या काळच्या लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री गीता दत्त यांच्यासोबत. त्यांना मुलंही होती. गुरू दत्त यांनी वहिदा रेहमानला पहिल्यांदा पाहिलं ते तेलगू सिनेमात. तेव्हाच वहिदांना हिंदी सिनेमात आणावं, हे त्यांनी मनात ठाम केलं आणि झालंही तसंच. गुरू दत्त यांची निर्मिती असलेल्या सीआयडीत वहिदा रेहमान यांना पहिली संधी मिळाली. त्यानंतर १९५७ मध्ये प्यासा सिनेमात दोघांची जोडी पडद्यावर झळकली. त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती.

गुरू दत्त वहिदा रेहमान

प्यासा सिनेमानं हिंदी सिनेमात क्रांती आणली आणि गुरू दत्त यांच्या आयुष्यात वादळ. वहिदा आणि गुरू दत्त यांच्यामधले प्रेमसंबंध वाढले, तसं गीता दत्तबरोबरचं अंतरही वाढलं. त्या काळात नवरा-बायकोची खूप भांडणं व्हायची. गीता दत्त तीन मुलांना घेऊन गुरू दत्त यांना सोडून गेल्या. दरम्यान, कागज के फूल, साहिब बिबी और गुलाम, चौदहवी का चांद असे सिनेमे गुरू दत्त करत होते आणि वहिदा रेहमान असल्याशिवाय सिनेमा व्हायचाच नाही.

प्रभास आणि करिना कपूर येणार एकत्र, ‘कबीर सिंह’च्या दिग्दर्शकाचा मोठा प्लॅन

गुरू दत्तचे मित्र अबरार अरबी यांनी ‘१० इयर्स विथ गुरू दत्त’ या पुस्तकात लिहिलं आहे की, गुरू दत्त यांना आपला संसारही हवा होता आणि वहिदा रेहमान यांनाही सोडायचं नव्हतं. पण तसं झालं नाही. गीता दत्त काही परत आल्या नाहीत. वहिदा रेहमान या मुस्लीम असल्यानं गुरू दत्त यांच्या कुटुंबानं त्यांना काही स्वीकारलं नाही. त्यांचा या नात्याला विरोधच होता. त्यामुळे वहिदा रेहमानही दुरावल्या.

गुरू दत्त

गुरू दत्त एकटे पडले. वक्त ने किया क्या हसी सितम या त्यांच्याच गाण्याप्रमाणे काळानं जणू सूडच उगवला. गुरू दत्त यांचा त्यांच्या मुलीवर जीव होता. पण गीता दत्त यांनी तिला भेटू दिलं नव्हतं.

PHOTOS: आलियाच्या या ड्रेसची किंमत माहित्येय?

गुरू दत्त उद्विग्न झाले होते. प्यासा सिनेमातल्या ये दुनिया मुझे मिल भी जाये तो क्या है या गाण्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. त्यांनी एक-दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि एक दिवस तो प्रयत्न दुर्दैवानं यशस्वी झाला. दिग्गज अभिनेता हे जग सोडून गेला. त्यावेळी वहिदा रेहमानही कोलमडल्या होत्या. कोण म्हणतं, कागज के फूल सिनेमा अपयशी ठरला होता. त्यामुळे अभिनेत्याला डिप्रेशन आलं होतं. वयाच्या ३९ व्या वर्षी सिनेसृष्टी एका महान अभिनेत्याला मुकली.

पत्रकार होणं कठीण असं का म्हणाली सोनाली कुलकर्णी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here