Buldana Crime News : व्हाट्सअप स्टेटसवर पत्नीचा अश्लील व्हिडिओ ठेवणाऱ्या विक्षिप्त पतीविरुद्ध पत्नीच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीसोबत असताना तिचे काही अश्लील व्हिडिओ पतीने काढले होते ते व्हिडिओ त्याने व्हाट्सअप वर स्टेटस म्हणून ठेवले होते.

 

Husband posted wife porn video to WhatsApp status Filed Buldana Crime News (1)
व्हाट्सअप स्टेटसवर पत्नीचा अश्लील व्हिडिओ; पतीच्या कृत्यानंतर पाहा पत्नीने काय केले

हायलाइट्स:

  • व्हाट्सअप स्टेटसवर पत्नीचा अश्लील व्हिडिओ ठेवणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल
  • लग्नानंतर पतीकडून त्रास असल्याने पती – पत्नी वेगळे
  • शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बुलडाणा : व्हाट्सअप स्टेटसवर पत्नीचा अश्लील व्हिडिओ ठेवणाऱ्या विक्षिप्त पतीविरुद्ध पत्नीच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगाव माहेर असलेल्या एका महिलेचे परभणी जिल्ह्यातील युवकासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पतीकडून त्रास असल्याने पती – पत्नी वेगळे राहत होते. पत्नीसोबत असताना तिचे काही अश्लील व्हिडिओ पतीने काढले होते ते व्हिडिओ त्याने व्हाट्सअपवर स्टेटस म्हणून ठेवले. याबाबत पिडित महिलेने शेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीमध्ये विक्षिप्त पतीने स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटसवर पत्नीचा नको त्या स्थितीतील अश्लील व्हिडिओ ठेवल्यामुळे समाजात बदनामी झाली, असं म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी, आरोपी विरुद्ध कलम ३५४ सह कलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस शहर ठाणेदार अनिल गोपाळ करत आहेत.

शिवसेना संपली, आता गप्प राहून आराम करा; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला
सहजासहजी इंटरनेट उपलब्ध होत असल्यामुळे सोशल मीडियाचं जाळं हे दिवसेंदिवस मजबूत होत चाललं आहे. सोशल मीडियाच्या जगात अश्लील व्हिडिओ, अश्लील जाहिराती या तरुणाईंच्या गळ्याला आवळत जाताना पाहायला देखील मिळत आहे. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी बीडमध्ये उघडकीस आली होती. यामध्ये व्हिडिओकॉलद्वारे एका महिलेने समोरच्या व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याला चक्क लाखो रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे फोन कॉल करत या व्यक्तीची मानसिक स्थिती खराब करून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न याठिकाणी सायबर क्राईम करणाऱ्या त्या महिलेने केला होता.

IND vs ENG: आज जिंकलात पण उद्याचा पराभव निश्चित; टीम इंडियाने केली मोठी चूक

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : husband posted wife porn video to whatsapp status filed buldana crime news
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here