सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती दिली आहे. मात्र प्रशासनाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, याबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात येणार असून त्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होऊ शकणार आहे.