monsoon rain updates: मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं वाहन चालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. डोंगराळ भागातील ओढे, नाले अधिक प्रमाणात प्रवाहित होतील. त्याचा परिणाम डोंगराळ भागातून होणाऱ्या वाहतुकीवर होईल.

हायलाइट्स:
- संपूर्ण कोकण पट्ट्यात ढगांची दाटी
- पावसामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता
- डोंगराळ भागातून होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार
रायगड, पुणे, सातारा, नाशिकमध्ये पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही मध्यम ते तीव्र पाऊस होऊ शकतो. मुंबईतील काही भागांत ढग दाटून आले आहेत. त्यामुळे पुढील ३ ते ४ तासांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई आणि रायगडच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. पावसाच्या सरींची तीव्रता वाढूही शकते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : monsoon rain updates very dense clouds observed over entire konkan intense spells of rains forecasted
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network