मुंबईच्या तरुणाचा जगभर डंका, मराठमोळ्या शॉर्टफिल्मने जिंकले तब्बल ७० हून अधिक पुरस्कार
तिनं नुकतंच एक ट्वीट केलं आहे. ते आहे मराठवाडा इथल्या पंढरी गावातल्या शाळेबद्दल. जिल्हा परिषदेच्या शाळेचा पूर्ण कायापालट केला आहे. राजश्रीनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, ‘निसर्गाच्या सान्निध्यातली ही शाळा अनेक झाडांखाली भरते. आमच्या पंढरी गावातल्या शाळेतली मुलं इथे खेळतात. शिक्षण घेतात. चांगला माणूस होण्याकडे चांची वाटचाल सुरू आहे.’ ती पुढे म्हणते, ७ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.
२०१५ ला नेपाळला मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर राजश्रीनं अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर गावागावात काम केलं. पुढे तिनं मराठवाड्यातलं पंढरी हे गाव दत्तक घेतलं. तिथे रेन वाॅटर हार्वेस्टिंग प्रकल्प चालवला. पुढे नभांगण नावाच्या एनजीओची स्थापना केली. मुलांसाठी चांगल्या वातावरणातलं शिक्षण हे या एनजीओचं उद्दिष्ट आहे.

एका मुलाखतीत राजश्री म्हणाली, ‘अनेक गावांत जाऊन तिथल्या शाळा पाहिल्या. सगळीकडे एकच स्थिती. शाळेची इमारत चांगली नाही, पुरेसा प्रकाश, हवा नाही, टाॅयलेट्स नाहीत. नभांगण एनजीओ मुलांना चांगल्या, स्वच्छ, मोकळ्या ठिकाणी शिक्षण द्यायला बांधील आहे. मुलं आनंदी राहूनच शिकायला हवीत.’
मुख्यमंत्र्यांची रंगभूषा कलाकाराला तातडीची मदत, ‘धर्मवीर’च्या निर्मात्याचा पुढाकार
आमिर खानच्या तलाश सिनेमातून राजश्रीनं बाॅलिवूड सिनेमात पदार्पण केलं होतं. त्यांनंतर सलमान खानच्या किक सिनेमातही ती होती. माॅम, द स्काय इज पिंक याही सिनेमात तिनं काम केलं होतं. कुछ तो लोग कहेंगे या मालिकेतही राजश्रीची भूमिका होती. पण तिच्या सेक्रेड गेम्स वेब सीरिजमधल्या भूमिकेमुळे ती चर्चेत आली.
मुलाला वाढवताना केलेल्या कोणत्या गोष्टीबद्दल निवेदिता सराफ यांना वाटते खंत?