मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचं आज दुपारी मेदांता रुग्णालयात निधन झालं. मुलायम सिंह यादव यांनी साधना गुप्ता यांना २००३ मध्ये पत्नीचा दर्जा दिला होता.

 

Sadhna Gupta
साधना गुप्ता यांचं निधन

हायलाइट्स:

  • मुलायमसिंह यादव यांना धक्का
  • दुसऱ्या पत्नी साधना गुप्तांचं निधन
  • मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास
लखनऊ : समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता (Sadhna Gupta) यांचं निधनं झालं आहे. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात साधना गुप्ता यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलायमसिंह यादव आणि साधना गुप्ता यांना एक मुलगा असून त्यांचं नाव प्रतीक यादव आहे. प्रतीक यादव राजकारणापासून दूर असून ते उद्योजक आहेत. साधना गुप्ता गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या, त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

साधना गुप्ता यांना काही दिवसांपूर्वी ताप आला होता, त्यानंतर फुफ्फुसातील संक्रमण वाढलं होतं. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. आज दुपारी त्यांची प्रकृती बिघडली, याची माहिती मिळताच मुलायमसिंह यादव मेदांता रुग्णालयात पोहोचले होते. त्यानंतर काही वेळातचं साधना गुप्ता यांचं निधन झालं.
राऊत म्हणाले ५० खोके पचणार नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंनी विचारलं, फक्त ५० का?
साधना गुप्ता समाजवादी पार्टीच्या राजकारणात सक्रिय होत्या. मुलायमसिंह यादव यांच्यांशी विवाह केल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारण सोडून दिलं होतं. त्या औरैया जिल्ह्यातील बिधूना येथील होत्या. साधना गुप्ता यांचा भाऊ प्रमोद कुमार गुप्ता समाजवादी पार्टीकडून आमदार म्हणून निवडून आले होते. काही दिवसांपर्वी प्रमोद कुमार गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
‘RBI’चा दणका; फेडरल बँकेला ५ कोटींचा आणि बँक ऑफ इंडियाला ७० लाखांचा दंड
२००३ मध्ये मुलायमसिंह यांच्याकडून पत्नीचा दर्जा
साधना गुप्ता या समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सावत्र आई होत्या. २००३ मध्ये अखिलेश यादव यांच्या आई मालती देवी यांचं निधन झाल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी साधना गुप्ता यांना पत्नीचा दर्जा दिला होता. साधना गुप्ता यांनी मुलायमसिंह यादव यांच्याशी दुसरा विवाह केला होता. फर्रुखाबाद येथील चंद्रप्रकाश गुप्ता यांच्याशी त्यांनी १९८६ मध्ये पहिलं लग्न केलं होतं मात्र ते लग्न फार काळ टिकलं नव्हतं. साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीक यादव हे उद्योजक असून त्यांची पत्नी अपर्णा यादव भाजपच्या नेत्या आहेत.

…तेव्हा बाळासाहेबही स्वर्गातून पुष्पवृष्टी करत असतील, संतोष बांगर यांच्या भावना

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sadhna gupta passed away today wife of samajwadi party leader mulayam singh yadav
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here