Pandharpur Major accident | या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी भाविकांवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता या अपघातामधील मृतांना आणि जखमींना राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाणार का, हे पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- हे सर्व भाविक कर्नाटकच्या अंनगुळ येथील होते
- रविवारी पहाटे आपल्या खासगी वाहनाने पंढरपूरच्या दिशेने येत होते
- या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे
या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी भाविकांवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता या अपघातामधील मृतांना आणि जखमींना राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाणार का, हे पाहावे लागेल. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो जण आज पंढरपूरमध्ये येतात. आजदेखील वारकरी आणि सामान्य भाविकांच्या गर्दीने पंढरपूर गजबजून गेले आहे.
दोन दिवसांपूर्वीच पंढरपूरच्या दिशेने येत असताना मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात झाला होता. वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात १४ वारकरी जखमी झाले होते. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली होती. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. या पूजेवेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत आणि नातू रुद्रांश अशा चार पिढ्या उपस्थित होत्या. ज्यांच्या चार पिढ्यांकडून एकत्र पूजा व वारी झाली असे एकनाथ शिंदे हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नवले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शासकीय महापूजा केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ashadi ekadashi 2022 major accident happened near pandharpur 2 died
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network