डहाणू : तलासरी तालुक्यातील झाई आश्रमशाळेतील चौथीत शिकणारी सरिता भरत निमला(रा. झरी डोलारपाडा, वय १०) या विद्यार्थिनीचा शनिवारी आजारपणामुळे मृत्यू झाला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालया अंतर्गत
सकाळची न्याहारी केल्यानंतर सरिताची प्रकृती खालावली. शाळा प्रशासन तिला रुग्णालयात घेऊन जात असताना, तिचा मृत्यू झाला. डहाणूच्या आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत एकूण २५१ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी २०७ निवासी आहेत. काही विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी ही लक्षणे आढळल्यानंतर शाळेने त्यांना शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार दिले. त्यामध्ये सारिकाचाही समावेश होता.