Eknath Shinde Camp Tanaji Sawant | विधिमंडळ सचिवालयाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या व्हीपचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विधिमंडळ सचिवालयाने दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी या नोटीस जारी केल्या आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

हायलाइट्स:
- तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी
- नवे संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती
- शिवसैनिकांना तानाजी सावंत यांच्या पुणे आणि सोलापूरमधील कार्यालयांची तोडफोड केली होती
या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालयाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या व्हीपचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विधिमंडळ सचिवालयाने दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी या नोटीस जारी केल्या आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शिवसेनेला आणखी एक धक्का, खासदार संजय जाधवही शिंदे गटात?
एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे परभरणीचे खासदार संजय जाधही एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. संजय जाधव हे रविवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंढरपूरमध्ये दिसून आले. महापूजा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंदिरातच संजय जाधव यांचा सत्कार केला. संजय जाधव यांच्या समर्थकांकडून ते शिवसेनेतच असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता संजय जाधव हे एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची दाट शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : shivsena uddhav thackeray take actions against eknath shinde camp rebel mla tanaji sawant
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network