तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असून या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तर जिल्ह्यामध्येही पाऊसाचे संततधार कायम आहे.

गेल्या २४ तासांमध्ये या ठिकाणी १२० मिलिमीटर इतके पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरण क्षेत्रात १५ हजार क्युसेक्सहून अधिक पाण्याचा पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने झाली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरण्यात सध्या १६.७० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ४८.५५ टक्के इतके धरण भरले आहे. तर धरणाच्या विद्युतगृह सांडव्यातून ७३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीमध्ये सुरू आहे, अशी माहिती चांदोली धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network