मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अनिता दाते सध्या काय करतेय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. ती पुन्हा छोट्या पडद्यावर कधी दिसणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक होते. अनितानं तिच्या चाहत्यांना धक्का दिला असून ती लवकरच छोट्या पड्यावर दिसणार आहे.


दोन दिवसांपूर्वी अनिताच्या एका पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं होतं.तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. अनिताच्या फोटोला हार घातलेला हा फोटो पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. तर तिनं लिहिलेल्या कॅप्शनमुळंही प्रश्नचिन्ह उभं राहीलं होतं.
Video: आलिया भट्ट भारतात परतली, एअरपोर्टवर रणबीरला पाहाताच…
‘जो आवडतो सर्वांना…’ असं तिनं कॅप्शन लिहिली होती. अनिताच्या या फोटोवर नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनीदेखील प्रतिक्रिया दिल्या होत्या. अभिनेत्री श्रृती मराठेनं ‘काय हे’? असं म्हटलं होतं; तर अभिनेता सागर कारंडेनं मात्र ‘खूप छान’ असं म्हटलं होतं. त्यामुळं आगामी एखाद्या कलाकृतीच्या प्रमोशनचा भाग असणार हे नक्की झालं होतं. मात्र आता या फोटो मागचं खरं कारण समोर आलं आहे.

अनितानं शेअर केलेला हा फोटो तिच्या आगामी मालिकेच्या संदर्भातला आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. मालिकेचा प्रोमो शेअर झाल्यानंतर चर्चेत आला आहे.


‘जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो…. त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट….” असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. प्रोमो पाहिल्यानंतर अनिता दिवंगत पत्नीच्या भूमिकेत असल्याचं दिसून येतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here