चेतन सावंत, मुलुंड : मुलुंडमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने स्वतःच्या आईची हत्या करून लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. छाया महेश पांचाळ असं ४६ वर्षीय मयत महिलेचे नाव असून तिची हत्या तिच्याच २२ वर्षीय मुलगा जय याने केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडच्या वर्धमान नगरमध्ये पांचाळ कुटुंबीय रहातात. काल संध्याकाळी मुलुंड पोलिसांना या ठिकाणी त्यांच्या घरातून रक्त येत असल्याचा कॉल आला. यावेळी मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घर उघडून पाहताच त्यांना घरात छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत मृत पडलेल्या आढळल्या.

पावसाचा कहर! प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात गेला वाहून, ३ जणांचे मृतदहे सापडले
इतकंच नाहीतर पोलिसांना एक गुजराती भाषेत चिट्ठी देखील आढळली. जी छाया यांचा मुलगा जय याने लिहिली होती. यात त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याने मुलुंड रेल्वे स्थानकात लोकल खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा तरुण लोकल खाली उडी मारत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलं आहे.

वडिलोपार्जित प्रॉपर्टी वरून हे दोघे माता-पुत्र डिप्रेशनमध्ये असल्याचं छाया यांच्या पतीने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Sangli Rain Today : सांगलीत अतिवृष्टी, पाणलोट क्षेत्रात पाणीपातळीत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here