Ram Kadam taunts Shivsena | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव असा केला होता. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचे असल्याचे केसरकर म्हणाले होते.

 

Uddhav Thackeray Ram Kadam
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • राम कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे
  • यामध्ये ‘संपवून दाखवलं!’ असा मजकूर लिहला आहे
  • राम कदम यांच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० नगरसेवक फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर भाजपमधील शिवसेनेचे कडवे विरोधक मानले जाणारे अनेक आमदार शिवसेनेवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करून वादंग निर्माण केला होता. त्यानंतर आता मुंबईतील भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. राम कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. यामध्ये ‘संपवून दाखवलं!’ असा मजकूर लिहला आहे. राम कदम यांच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने असल्याचे दिसत आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार करताना शिवसेनेकडून ‘करुन दाखवलं’ ही टॅगलाईन वापरण्यात आली होती. तोच धागा पकडत राम कदम यांनी ‘संपवून दाखवलं’ असा मजकूर लिहून शिवसेनेला डिवचले आहे. यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई; तानाजी सावंतांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव असा केला होता. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचे असल्याचे केसरकर म्हणाले. त्याबद्दल आम्ही ताबडतोब फडणवीसांना सांगितले आहे. फडणवीस याबाबत निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला होता.

Ram Kadam 11

“ठाकरेंबाबत सोमय्यांनी जपून बोलावं, नाहीतर आम्हाला सत्तेची पर्वा नाही”

किरीट सोमय्या यांनी असं काही समजू नये, की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजप-शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेब किंवा आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमची श्रद्धा नाही, निष्ठा नाही आणि आम्ही त्यांना शिव्या-शाप देऊ, असा समज किरीट सोमय्यांनी करुन घेऊ नये. ज्या पक्षात आम्ही घडलो, त्या पक्षप्रमुखांना त्यांनी नाव ठेवू नये व यापुढे त्यांनी असं वक्तव्य करु नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे भाजप व शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp mla ram kadam takes a dig at shivsena uddhav thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here