पंढरपूर : राज्यभरात आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांच्या पायी वारीनंतर लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठ्ठलभक्तीत सामान्य नागरिकांसह राजकीय नेतेही दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: चहा बनवला. वारकऱ्यांनीही भरपावसात या चहाचा आनंद घेतला.

भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप येथील सुभाष वाघ हे आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी चहा बनवून वारकऱ्यांना देतात. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूरमध्ये लागले आहे. या हॉटेलमध्ये केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी चहा तयार करून वारकऱ्यांना वाटला.

रजेवर असलेल्या जवानाने ड्युटी बजावली, जीवाची बाजी लावून ५ जणांचा जीव वाचवला

मतदारसंघातील आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडीमधील वारकऱ्यांची रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली आणि आत्मियतेने विचारपूसही केली.

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून खासदार असलेले आणि आता केंद्रात मंत्री झालेले रावसाहेब दानवे हे नेहमीच आपल्या रांगड्या शैलीसाठी आणि ग्रामीण बोलीसाठी चर्चेत असतात. सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्या जीवनशैलीत रममाण होणाऱ्या दानवे यांचे अनेक किस्से सर्वश्रुत आहेत. त्यातच आता त्यांनी स्वत: वारकऱ्यांसाठी चहा बनवल्याने याबाबतच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here