मुंबई: करोनामुळे दोन वर्षं खंड पडलेली वारी पुन्हा त्याच उत्साहात, जल्लोषात निघाली .अवघं पंढरपूर विठ्ठलनामात एकरूप झालंय. ‘विठ्ठल विठ्ठल…जय हरी विठ्ठल…’ असं म्हणत वारकरी पंढरपुरात पोहोचले. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी खास पद्धतीनं आज आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला अभिनेता समीर परांजपेनं समीर परांजपे यानं संगीतमय शुभेच्छा दिल्या आहेत.

आज असलेल्या आषाढी एकादशीनिमित्तानं अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु समीर परांजपे यांनं शेअर केलेला व्हिडिओ विशेष चर्चेत आला आहे. समीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत तो ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे गाणं गाताना दिसतोय. साडेतीन मिनिटांच्या या व्हिडिओ समीर अतिशय भक्तीभावानं विठुरायाचं हे गाणं गाताना आपल्याला दिसून येतो.
फोटो मागचं कोडं उलगडलं, अनिता दातेची नवीन मालिका; हटके प्रोमो व्हायरल
समीरनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याच्या आवाजाचं कौतुक केलंय.


समीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर , ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर ‘गोठ’, ‘गर्जा महाराष्ट्र’ आणि ‘अग्निहोत्र २’ या मालिकेत त्यानं नायकाची भूमिका साकारली.
Video: आलिया भट्ट भारतात परतली, एअरपोर्टवर रणबीरला पाहाताच…
‘भातुकली’ या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या ‘क्लास ऑफ ८३’मधून दिसलेला समीर आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत एका वेगळ्या नायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here