रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण-खेड दरम्यान धोकादायक झालेला परशुराम घाट व पेढे ग्रामपंचायत सरपंच प्रवीण पाकळे यांनीही हा घाट पावसाळ्यात वाहतूकीसाठी बंद करावा अन्यथा आमच्या गावास मोठा धोका असल्याची गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अभिप्राय लक्षात घेत या घाटातील सगळ्या प्रकारची बंद असलेले निर्बंध १२ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

चिपळूण महसूल उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांच्याकडुन हे लेखी आदेश शनिवारी रात्री उशिरा जारी करण्यात आले आहेत. या कालावधीत अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गेही बंदच राहणार आहे. ही सर्व प्रकारची अवजड (Heavy Loaded Vehicles) वाहतुक मुंबई पुणे मार्गे व माणगाव-ताम्हिणी मार्गे वळविणे आली आहेत.

मुंबई हादरली! जन्म देणाऱ्या आईलाच २२ वर्षाय तरुणाने कायमचं संपवलं, हत्येनंतर जे केलं ते वाचून हादराल…

यापूर्वी घाटात वारंवार दरडी कोसळल्या आहेत व पुढेही असलेला धोका लक्षात घेण्यात आला. जिल्ह्याला पावसाचा देण्यात आलेला रेड अलर्ट यामुळे हवामान खात्याने दिलेला अतिमुसळधार पाऊस असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १२ जुलैपर्यंत परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी चिरणी आंबडस या पर्यायी मार्गाने वाहतुक सुरू राहणार आहे.

पावसाचा कहर! प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात गेला वाहून, ३ जणांचे मृतदहे सापडले
हा घाट पावसाळ्यात धोकादायक झाला असून काही ठिकाणी दरडी कोसळून जीवतहानी होऊ शकते तसेच पेढे परिसरातील दुर्गेवाडी येथील डोंगरावर पडलेली भेगही धोकादायक ठरु शकते. वाहनांचे वाजणारे हॉर्न या कंपनानेही माती खाली घसरु शकते अशी भीती चिपळूण पोलीस प्रशासनाकडुन व्यक्त करण्यात आली होती यावरून परशुराम घाटाची नाजूक स्थिती लक्षात घेण्यासारखी त्यामुळे पावसाळ्यात हा घाट नियमितपणे वाहतूकीस सुरू होण्याची शक्यता कमी असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे पावसाळ्यात परशुराम घाटातून प्रवास बाप रे… नको रे बाबा…असच म्हणायचीच वेळ आली आहे.

हिंगोलीत अतिवृष्टीचा तडाखा; तब्बल १०० जनावरं गेली वाहून, ८ गावांचं नुकसान

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here