Goa political crisis | महाराष्ट्राप्रमाणे दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वाखालील आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगते. त्यामुळे रविवारी रात्रीपर्यंत काँग्रेस आमदारांचा हा गट भाजपमध्ये विलीन होईल, अशी चर्चा आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ११ जुलै म्हणजे सोमवारपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या गोव्यातील राजकारणाला वेग आला आहे.

हायलाइट्स:
- काँग्रेस आमदारांच्या बंडाची कुणकुण लागताच काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव तातडीने याठिकाणी दाखल झाले आहेत
- त्यांच्याकडून आमदारांची मनधरणी सुरु
- भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर
महाराष्ट्राप्रमाणे दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वाखालील आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगते. त्यामुळे रविवारी रात्रीपर्यंत काँग्रेस आमदारांचा हा गट भाजपमध्ये विलीन होईल, अशी चर्चा आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ११ जुलै म्हणजे सोमवारपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या गोव्यातील राजकारणाला वेग आला आहे. काँग्रेस आमदारांच्या बंडाची कुणकुण लागताच काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव तातडीने याठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आमदारांची मनधरणी सुरु असल्याची माहिती आहे. मात्र, भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्यामुळे विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि अन्य आठ ते नऊ आमदार पक्ष सोडण्यावर ठाम असल्याची माहिती आहे.
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. पक्षाला केवळ अकरा जागांवर समाधान मानावे लागले. पण मागील निवडणुकीनंतर पक्षाला पडलेल्या खिंडारानंतरही हे यश पक्षाला मिळालं. प्रचारादरम्यान पक्षाने सर्व उमेदवारांना शपथ दिली. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले की, निवडून आल्यानंतर किंवा पराभूत झाल्यानंतर इतर पक्षात जाणार नाही. गोवा विधानसभेत सध्या काँग्रेसकडे ११, भाजपकडे २०, मगोप दोन आणि तीन अपक्ष आमदार आहेत. आता काँग्रेसमधून खरंच १० आमदार भाजपमध्ये आल्यास भाजपची बाजू खूपच भक्कम होईल. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपने हा सर्व प्लॅन आखल्याची माहिती आहे. या सगळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लवकरच गोव्यात दाखल होतील, असे सांगितले जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : goa political crisis congress leader digambar kamat and 8 to 10 mla’s may join bjp soon
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network