Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 10, 2022, 3:36 PM
मराठी सिनेसृष्टतील अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मंगेश देसाई चर्चेत आहेत. चर्चेचं कारण म्हणजे त्यांनी निर्मिती केलेला ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट.
या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्यांनी अनेक दौरे केले. गेले काही दिवस सतत व्यग्र वेळापत्रक असल्यानं आता कुटुंबियांसोबत काही वेळ घालवण्यासाठी ते कर्जला निघाले होते.
नवी मुंबईतील कोकण भवन समोरील पुलावर हा अपघात घडल्याची माहिती आहे. गाडीतील सर्वजण सुखरुप असल्याचंही मंगेश देसाईंनी सांगितलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network