औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पोलिसांनी मोठं रॅकेट उघड केलं आहे. लग्नाला मुली मिळत नसलेल्या तरुणांना पसंत पडेल अशी मुलगी दाखवायची. पसंती झाली की मग मुलीची मावशी, मामासह इतर कुटुंबीय म्हणून भाड्याने माणसं आणायची. लाखोंचा सौदा ठरवायचा. एकदा का लग्न झाले की, मग नवरीने अंगावरील दागिने घेऊन पसार व्हायचे. अशा पद्धतीने या रॅकेटचा काम सुरू होते. ५० पेक्षा अधिक तरुणांना या टोळीने फसविले असून दौलताबाद पोलिसांनी या टोळीतिल लताबाई पाटील हिला ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार अशाबाई बोरसे फरार आहे.
दौलताबादकिल्ला पाहण्याचा बहाण्याने लग्नाच्या अवघ्या चौथ्या दिवशीच नवरीने पळ काढला होता. याप्रकरणी ८ एप्रिल रोजी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी नववधू ममता पाटील हिला अटक केली. तिच्या चौकशीत लग्न लावून देणाऱ्या टोळीची आशाबाई प्रकाश बोरसे (रा. भडगाव, जि. जळगाव) ही मास्टर माईंड असून तिला लताबाई राजेंद्र पाटील ₹रा. जळगाव) हिने मदत केल्याचे स्पष्ट झाले होते. पोलीस दोघींच्या शोधात होते, ६ जुलै रोजी लताबाई जळगावात असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे पोलिसांनी जळगावला पोहोचले. पुणे: इंद्रायणी नदीला पूर, अलंकापुरीतील भागीरथी कुंड पाण्याखाली; नदीचे रौद्ररुप दाखवणारा LIVE VIDEO यांनी लताबाईला ताब्यात घेतले तिने टोळीची सूत्रधार आशाबाई असल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक भडगावला पोहोचले पोलीस आल्याची कुणकुण लागताच अशाबाईने पळ काढला. पथक लताबाईला घेऊन दौलताबादला आले. ही टोळी फक्त महाराष्ट्र पुतरी मर्यादित नसून गुजरात राज्यात देखील या टोळीने आशा पद्धतीने अनेक तरुणांना फसविल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लग्नाळू तरुणांना या टोळीने फसविले आहे. पोलिसांचे विविध पथक या टोळीच्या सूत्रधार महिलेच्या शोधत आहे.