इटावा: लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हा दिवस अविस्मरणीय व्हावा म्हणून अनेक जण कित्येक दिवस योजना आखत असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका वधूनं फेरे सुरू असताना लग्न विधी थांबवले. नवरदेव फारच सावळा सावळा असल्याचं म्हणत तिनं लग्नच रद्द केलं. घडलेला पाहून उपस्थित कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना धक्काच बसला.

इटावातील भरथनामध्ये लग्न सोहळा सुरू होता. नीता यादव यांचा विवाह रवी यादव यांच्याशी होणार होता. लग्नविधींना सुरुवात झाली. मात्र दोन फेरे होताच नीता अचानक थांबली. आपण हे लग्न मोडत असल्याचं तिनं जाहीर केलं. मला आधी दाखवण्यात आलेला नवरा मुलगा वेगळा होता आणि ज्याच्याशी लग्न होतंय तो मुलगा वेगळा असल्याचा दावा नीतानं केला. मांडवात असलेला मुलगा जरा जास्तच सावळा असल्याचंही नीता म्हणाली.
‘शंकर-पार्वती’ बाईकवरून निघाले, पेट्रोल संपले; पथनाट्य सादर केले; लगेच गुन्हे दाखल झाले
यानंतर नीता मंडप सोडून निघून गेली. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही नीता मांडवात परतली नाही. जवळपास ६ तासांहून अधिक वेळ कुटुंबीयांनी नीता यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र लग्न न करण्याच्या निर्णयावर ती ठाम राहिली. त्यामुळे वरात परत गेली.
तुपाच्या वाहत्या गंगेत साऱ्यांनी हात धुतले; ग्रामस्थ हंडा, कळशी, टोप, बादली घेऊन पोहोचले
या प्रकरणी नवरदेवाच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. वधूला भेट म्हणून दिलेले लाखो रुपयांचे दागिने तिनं परत केले नसल्याचं वडिलांनी तक्रारीत म्हटलं आहे. वधू आणि तिचं कुटुंब अनेकदा मला भेटलं होतं. मात्र अचानक त्यांचं मनपरिवर्तन कसं झालं त्याची मला कल्पना नाही. झाल्या प्रकारामुळे अतिशय दु:ख झाल्याचं नवरदेवानं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here