जम्मू-काश्मीर: अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी झाली. त्यानंतर आलेल्या पुरात अनेकजण अडकले. अडकलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी भारतीय लष्कराचे जवान अत्याधुनिक यंत्रांचा, वाहनांचा वापर करत आहे. ढगफुटीची माहिती मिळताच भारतीय जवान लगेच कामाला लागले. इन्फ्रेंटी बटालियनसोबतच शीघ्र कृती दल, राष्ट्रीय रायफल्सचे जवानदेखील अविश्रांत मेहनत घेत आहेत.

पूरपरिस्थितीमुळे अडकून पडलेल्या भाविकांच्या मदतीसाठी जवानांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. याच मदतकार्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून जवानांबद्दलचा आदर नक्कीच वाढेल. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवान करत असलेल्या मदतकार्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. लष्कराचे जवान कोणत्या परिस्थितीत काम करतात, संकटांचा सामना कसा करतात, याचा प्रत्यय देणारा व्हिडीओ संरक्षण मंत्रालयाच्या उधमपूर येथील जनसंपर्क कार्यालयानं ट्विट केला आहे.
खेळ कुणाला दैवाचा कळला? २६ वर्षांपूर्वी वडिलांवर अंत्यसंस्कार केले, ते आज अचानक भेटले
डोंगराळ भागात मदतकार्य करणं अवघड असतं. भौगोलिक परिस्थिती कसोटी पाहत असते. अमरनाथमध्ये लष्कराचे जवान अत्याधुनिक यंत्र, वाहनं वापर आहेत. व्हिडीओमध्ये लष्कराच्या इंजिनीयर रेजिमेंटचे १२ जवान डोंगराळ भागात सुमारे ३ टन वजनाची मशीन खेचून घेऊन जाताना दिसत आहे. या मशीनचा वापर खोदकामासाठी करण्यात येतो.

हवामान बिघडल्यानं जम्मू ते अमरनाथ यंत्रणा रोखण्यात आली आहे. कोणत्याही नव्या गटाला, पर्यटकांना दक्षिण काश्नीरमध्ये असलेल्या गुफेकडे जाण्याची परवानगी दिली जात नाहीए. अमरनाथ गुफेच्या परिसरात शुक्रवारी ढगफुटी झाली. त्यामुळे अचानक पूर आला. यामध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here