Shivsena vs Eknath Shinde | संतोष बांगर हे मागील १२ ते १३ वर्षांपासून हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर होते. त्यांना २०१९ साली शिवसैनिकांनी कळमनुरी मतदार संघातून आमदार केले. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी केली.त्यावेळी संतोष बांगर मातोश्री सोबत होते,पण एकनाथ शिंदे गटाने व्हीप बजाविल्यानंतर मात्र आपली आमदारकी जाते की काय या भीतीपोटी संतोष बांगर एकनाथ शिंदे यांना फोन करून स्वतःहून शिंदे गटात सहभागी झाले होते.

 

Santosh Banger Uddhav Thackeray
संतोष बांगर आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी
  • संतोष बांगर बंडखोरांनी पुन्हा परत यावं म्हणून रडले होते
  • बहुमत चाचणीच्या दिवशी ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिसून आले
मुंबई: शिवसेनेने आता एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर कारवाईचा धडका लावला आहे. कालच सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे. याशिवाय, शिवसेनेने कोकणातील आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांच्या समर्थकांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
बंडखोरांवरील कारवाईसाठी शिवसेनेला वाट पाहावी लागण्याची शक्यता; सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर?

मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे अनेक नाट्यमय घडामोडी करून बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते.बहुमत चाचणीच्या दिवशी ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिसून आले होते. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला होता. संतोष बांगर हे मागील १२ ते १३ वर्षांपासून हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर होते. त्यांना २०१९ साली शिवसैनिकांनी कळमनुरी मतदार संघातून आमदार केले. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी केली.त्यावेळी संतोष बांगर मातोश्री सोबत होते,पण एकनाथ शिंदे गटाने व्हीप बजाविल्यानंतर मात्र आपली आमदारकी जाते की काय या भीतीपोटी संतोष बांगर एकनाथ शिंदे यांना फोन करून स्वतःहून शिंदे गटात सहभागी झाले होते.
आता शिवसेनेच्या खासदारांचा नंबर; एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार, भाजप खासदाराने थेट सांगितला आकडा
बहुमत चाचणीला एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने मतदान करीत पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून ही माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे सोबत असताना हेच संतोष बांगर बंडखोरांनी पुन्हा परत यावं म्हणून रडले होते. याच संतोष बांगर यांनी बंडखोर आमदारांच्या ‘बायका एक दिवस त्यांना सोडून जातील’,’त्यांचे मुलं मुंजे मरतील’,’गद्दाराच्या मुलांना कोण बायका देणार?’, असे म्हणत बंडखोर आमदारांना दीडशे ते दोनशे कोटी रुपयांच्या ऑफर मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र, ऐनवेळी आमदार बांगर शिंदे गटात गेल्याने त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड टोल केले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena uddhav thackeray take action on eknath shinde camp santosh banger and mla uday samant supporters
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here