Vijay Mallya : फरार उद्योजक विजय मल्ल्या याला आज सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांचा तुरुंगावास ठोठवला. कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत मल्ल्या याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हायलाइट्स:
- फरार उद्योजक विजय मल्ल्या याला आज सर्वोच्च न्यायालयाचा दणका
- न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने तुरुंगवास ठोठावला
- दोन हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश
मागील पाच वर्षांपासून विजय मल्ल्या लंडनमध्ये आहेत. मल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी जवळपास ९००० कोटींचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने अनेक सरकारी बँकांना तोटा झाला होता. मल्ल्या यांनी बँकांची कर्जे बुडवून लंडनला पलायन केले होते. भारतातील न्यायालयांनी मल्ल्या यांना फरार घोषीत केले. तसेच विविध तपास यंत्रणांची मल्ल्या आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची स्थावर जंगम मालमत्ता जप्त केली. काही मालमत्तांचा लिलाव करुन कर्ज वसुली करण्यात आली होती.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : supreme court awards 4-month jail sentence and imposes rs 2000 fine on fugitive businessman vijay mallya
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network