किती शुल्काने वीजबिल वाढणार?
यामुळे आता जर तुम्हाला ५०० रुपये बिल येत असेल तर ते वाढून तुम्हाला ५८० रुपये बिल येईल. १ हजार रुपये बिल येत असेल तर ते वाढून आता १ हजार २०० होईल आणि जर तुम्हाला १ हजार ५०० बिल येत असेल तर ते वाढून हजार ७०० होईल. म्हणजेच तुमच्या बिलामध्ये १५ ते १६ टक्के वाढ होणार असून ही सामान्यांच्या खिशाला कात्री आहे.
‘महाविकास आघाडी सरकारच्या चुकीचा परिणाम’
महाविकास आघाडीच्या चुकीच्या कारभारामुळे ग्राहकांना महागडी वीज मिळणार असल्याचा आरोप भाजप नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आघाडी सरकारने स्वस्त वीज खरेदी केली नाही. त्या काळात कोळशाचा साठा नव्हता. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात महागड्या दराने वीज खरेदी करण्यात आली. त्यामुळे तो पैसा वसूल करण्यासाठी बिलांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, महावितरणनेही एमईआरसीची मान्यता घेतली असून हे शुल्क फक्त ४ महिन्यांसाठी आकारले जाईल, अशीही माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
आर्थिक गणित कोलमडणार…
महागाई जास्त असताना ज्या ग्राहकांना मासिक वीज बिलासाठी अधिक पैसे द्यावे लागतात त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. एलपीजीचे दर प्रति सिलिंडर रु. १००० ओलांडले आहेत, पाईप गॅसची किंमत सुमारे ४५ रुपये प्रति युनिट आहे, सीएनजी ७६ रुपये प्रति किलो, पेट्रोल १११.३५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९७.२५ रुपये आहे. त्यात या वाढीमुळे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
काय आहेत फिटनेस टिप्स?