Kolhapur School Bus Accident News: कोल्हापुरात खासगी शाळेच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.

 

Kolhapur School Bus Accident
कोल्हापूर : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पूर आल्याच्या बातम्या आहेत. अशात रस्ते खराब असल्याने अपघाताची भीषण घटना कोल्हापुरात समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये पन्हाळा तालुक्यातील एका खासगी शाळेच्या बसचा अपघात झाला आहे. अरुंद रस्ता असल्याने आळवे गावाच्या अलीकडे रस्त्याकडेला असलेल्या शेतात बस पलटी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये अनेक विद्यार्थी. पण सतर्कता दाखवत सर्वांना आपत्कालीन दरवाजमधून बाहेर काढण्यात आले. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

Maharashtra Monsoon 2022 : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट
पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमधील के. एस. चौगले इंग्लिश मीडियम शाळेची ही बस आहे. रस्ता लहान असल्याने बस पलटी झाली. यामध्ये सर्व विद्यार्थी सुखरूप असून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.

Electricity Bill Hike : महावितरणाकडून नागरिकांना शॉक, महिन्याचे बिल ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : private school bus crashes in kolhapur bus overturns in field due to narrow road
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here