मुंबई: गेल्या काही वर्षांपासून सायबर क्राईम वाढत आहे. वाढत्या इंटरनेटच्या वापरांमुळं लोकांचं आयुष्य तर अधिक सहज सोपं झालंय. पण, सोबतच यामुळं अनेक अडचणी देखील वाढल्या आहेत. अनेकदा नागरिकांना सायबर क्राईमसारख्या गोंष्टींबद्दल माहिती नसते. आणि त्याच्या नकळत ते सायबर क्राईमला बळी पडतात. यामुळं आतापर्यंत अनेकांना हजारोंचा फटका सहन करावा लागला आहे. यात आता सेलिब्रिटींची संख्या वाढत चालली आहे. सिनेसृष्टीतील एक अभिनेत्री नुकतीच सायबर क्राईमची शिकार झाली आहे.

एका चुकीमुळं ७५ हजार गेले, भाग्यश्री मोटेला सायबर क्राईमचा फटका
क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया सारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री अमन संधू हिला सायबर क्राईमचा फटका बसला आहे. तिच्या अकाऊंटमधून तब्बल दोन लाख रुपये परस्पर ट्रान्सफर झाले आहेत. व्हॉट्सअॅपवर आलेल्या एका लिंकवर केल्यानंतर तिच्या अकाऊंटमधून दोन लाख रुपये गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
रणवीर सिंगचे नवे घर आहे तब्बल ११९ कोटींचे! शाहरुख खानचा होणार शेजारी
काय घडलं नेमकं?
आईच्या उपचारांसाठी एका प्रसिद्ध डॉक्टरांचा नंबर शोधण्यास अमननं गुगलची मदत घेतली. गुगवर ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा नंबर सर्च केल्यानंतर तिनं एका नंबरवर क्लिक केलं. यानंतर व्हाट्सअॅप ओपन झालं आणि तिचा फोन हॅक करण्यात आला. फोन हॅक करण्यात आल्यानंतरर तिच्या बॅंक अकाऊंटमधून तब्बल दोन लाख ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

‘मी कोणतेही बॅंक डिटेल्स शेअर केले नव्हते. परंतु माझा फोन हॅक झाल्यानं त्यांना माझ्या फोनचा अॅक्सेस मिळवला आणि ट्रान्जॅक्शन केल’, असं तिनं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here