“मी विठ्ठलाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी आले आहे. हे सरकार अस्थिर आहे हे अजितदादा म्हणतोय ते खरं आहे. ज्या पद्धतीने हे लोक सुरत, गुवाहटी, गोवा भारत दर्शन करून आले. ज्या रीतीने आपल्या आमदारांना बाहेर राज्यातील पोलीस हाताळत होते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे जे काही होतंय ते महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी हिताचं नाहीये,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, मित्र पक्ष म्हणून आम्ही शिवसेनेला शेवपर्यंत साथ दिली आहे आणि यापुढेही देत राहणार. शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण हे बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच ठरवलं होतं आणि बाळासाहेबांच्या आदेशाच्या वेगळं काही करणं हे बाळासाहेबांना दुखावण्याचं काम आहे, असं म्हणत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.
सरकार एका विमानातून उतरतंय आणि दुसऱ्या विमानात बसतंय. फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजार रुपयांची दाढी करतंय, अडीच हजार रुपयाची कटिंग करतंय. यातून सामान्य कष्टकरी आणि शेतकरी भरडतोय. हे आत्ताच सरकार सत्ता आणि पैशाच्या जीवावर आलेल आहे. या सरकारला सर्वसामान्य माणसांच काहीही प्रेम नाही, हे अस्ववेदनशील शिंदे सरकार आहे, असा घणाघाती टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.