मुंबई: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून साईशा भोईर आणि स्पृहा दळी या दोन बालकलाकार घराघरांत पोहोचल्या. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. पण कार्तिकी म्हणजेच साईशा भोईर हिनं काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. परंतु साईशाच्या शाळेसाठी हा निर्णय घेतल्याचं तिच्या आईनं सांगितलं होतं. परंतु आता वेगळंच कारण समोर आलं आहे.
क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्रीला लाखोंचा गंडा, व्हॉट्सअॅपवर ‘ती’ लिंक ओपन केली अन्…

झी मराठी वाहिनीवर ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साईशा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळं शाळेसाठी मालिका साोडल्याचं कारण काहीसं खरं नसल्याचं आता समोर आलं आहे. यानंतर साईशाच्या पालकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
सोनालीच्या साडी आणि नथीनं केलं घायाळ… पदर उडवत काय म्हणाली बघा


काय म्हणाली होती साईशाची आई?
साईशाच्या आईनं म्हणजे पूजा भोईर यांनी सांगितलं होतं की, ‘मागचं वर्ष ऑनलाइन शाळा होती. त्यामुळं चित्रीकरण आणि शाळा या दोन्हीच्या वेळा जमून येत होत्या. शाळेनंही यासाठी खूप सहकार्य केलं होतं. पण आता ऑफलाइन शाळा सुरू होणार आहे. त्यामुळं शाळेला हजेरी लावून रोज तीन तासांचा प्रवास करत १० ते १२ तास चित्रीकरण करणं खूप दमवणारं आहे. तसंच साईशाला आता शालेय जीवनाचा प्रत्यक्ष शाळेत जाऊन आनंद घ्यायचा आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या निमित्तानं तिला छोट्या पडद्यावर काम करण्याचा अनुभव मिळाला. आता इतरही काही कलाकृतींसाठी तिचं काम सुरू आहे. त्यामुळं कमी वेळात अधिकाधिक काम करण्यावर आमचा भर असेल.’ साईशा मालिकेला निरोप देणार असली तरी लवकरच ती मोठ्या पडद्यावर विविध कलाकृतींमधून दिसेल असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here