नाशिक : पावसाळा सुरू होताच पर्यटक हे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसतात. मात्र, हाच आनंद आपल्या जीवावर देखील बेतू शकतो याचा धूसर विचार सुद्धा काहींच्या मनात येत नाही. असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे. याचा एक व्हिडिओ आमच्या हाती लागला असून तो पाहिल्यानंतर तुम्हीही हादराल.
तुम्ही पाहू शकता या व्हिडिओतील एका व्यक्तीने तर थेट रस्त्यावरच नागीण डान्स केल्याचे दिसून येत आहे. निसर्गाचा आनंद घेताना पर्यटकांनी अशा प्रकारे हुल्लडबाजी करणे हे निंदनीय आहे. यावर तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.