सुमितोमो केमिकल्स लिमिटेडचा स्टॉक रु. ५५० आणि रु. ५८० चा टप्पा गाठू शकतो. गुंतवणूकदारांसाठी काही प्रमाणातील नफ्यासाठी हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावा.

 

रसायन निर्मिती क्षेत्रातील आघाडीचा सुमितोमो केमिकल्सचा स्टॉक
रसायन निर्मिती क्षेत्रातील आघाडीचा सुमितोमो केमिकल्सचा स्टॉक

हायलाइट्स:

  • सुमितोमो केमिकल्स लिमिटेडच्या स्टॉकने वेगवान मूल्यतेजी दर्शविली आहे.
  • तो शुक्रवारच्या तुलनेत ५% पेक्षा अधिक वाढला आहे.
  • ५०० रुपयांच्या ताज्या सार्वकालिक उच्च पातळीवर तो आता पोहोचला आहे.
मुंबई : सोमवारच्या नकारात्मक वातावरणात सुमितोमो केमिकल्स लिमिटेडच्या स्टॉकने वेगवान मूल्यतेजी दर्शविली आहे. तो शुक्रवारच्या तुलनेत ५% पेक्षा अधिक वाढला आहे. ५०० रुपयांच्या ताज्या सार्वकालिक उच्च पातळीवर तो आता पोहोचला आहे. गेल्या काही दिवसात या शेअरमध्ये किमान मूल्य स्तरावर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणातील खरेदी स्वारस्य दिसून आले. ४०७ रुपयांच्या आधीच्या नीचांकीवरून त्याने २२% झेप घेतली आहे. १३ व्यवहार सत्रात त्याची ही अशी उल्लेखनीय मूल्य हालचाल राहिली आहे. तांत्रिक आधारावर, या कंपनी शेअरने एक तेजीची कँडल तयार केली आहे. ती सरासरीपेक्षा अधिक व्यवहार नोंद करणारी आहे. शेअरची व्यवहार संख्या १०-दिवस आणि ३०-दिवसांच्या सरासरी व्यवहार संख्येपेक्षा अधिक असतो. यातून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमधील सक्रिय खरेदी दिसून येते.

घसरणीच्या शेअर बाजारात हे पेनी स्टॉक मात्र अप्पर सर्किटमध्ये
कंपनी शेअरच्या तेजीच्या किमत रचनेसह त्यातील तांत्रिक मापदंड हे या स्टॉकची मूल्य भक्कमता सूचित करतात. १४-कालावधी दैनिक RSI (७२.३५) तेजीत आहे. तर शेअर त्याच्या पूर्वीच्या उच्चांकापेक्षाही अधिक स्तरावर आहे. दरम्यान, शेअरचे ADX (24.46) एक प्रमुख वरचे कलसामर्थ्य दर्शवते. शेअरचा MACD हिस्टोग्राम वरची मूल्य हालचाल प्रदर्शित करत वाढत असल्याचे दर्शविते. OBV हे सकारात्मकतेसह शिखरावर असताना इतर कल निदर्शकही या स्टॉकच्या तेजीच्या अनुषंगानेच आहेत.

भारतातील क्रमांक १ चे गुंतवणूक मासिक ‘दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल’च्या माध्यमातून हा लेख तयार केला आहे. तेजीतील शेअर आणि शिफारशी नियमित प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा आणि सहभागी व्हा.
वार्षिक आधारावर या कंपनी स्टॉकने ३०% उत्पन्न नोंदविले आहे. मोठ्या फरकाने व्यापक बाजाराला या शेअरने मागे टाकले आहे. या स्टॉकची वेगवान मूल्य गती लक्षात घेता त्यात अधिक व्यवहार होण्याची अपेक्षा आहे. आगामी कालावधीत हा स्टॉक रु. ५५० आणि रु. ५८० च्या पातळीची चाचणी गाठू शकतो. गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली व्यवहार संधी उपलब्ध होत असून त्यांनी काही प्रमाणातील नफ्यासाठी हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवावा.
Disclaimer : This above is third party content and TIL hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. TIL does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : top trending stock sumitomo chemicals ltd
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here