मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय आणि परखड विचार मांडणारे अभिनेते अशी ओळख असलेले शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शरद हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. आपली मतं ते निर्भीडपणे ट्विटर, फेसबुकवर मांडत असतात. पण त्यांनी नुकताच शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. हा फोटो आहे त्यांच्या लेकीसोबतचा.
साईशानं शाळेसाठी ‘रंग माझा वेगळा’ मालिका सोडली? खरं कारण आलं समोर
शरद पोंक्षे यांनी मुंबई विमानतळावरचा लेकीसोबत फोटो शेअर केलाय. त्यांची लेक सिद्धी आता परदेशात शिक्षण घेण्यासाठी निघाली आहे. तिला पायलट व्हायचं आहे. लेकीला परदेशात पाठवताना शरद पोंक्षे भावुक झाले होते. त्यांनी सिद्धीसोबत फोटोशेअर करत तिला बाय म्हटलं आहे. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Video : ह्रता दुर्गुळेची प्रथमेशबरोबरची रोमँटिक अदाकारी, ‘टाइमपास ३’चं नवं गाणं झालं लोकप्रिय

गेली काही वर्षे शरद पोंक्षे यांच्या कुटुंबियांना अवघडच गेली होती. पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय खंबीरपणे त्यांना साथ दिली. अशा परिस्थितीत अभ्यास करून त्यांची लेक आता उच्च शिक्षणासाठी परदेशात निघाली आहे. तिनं बारावीच्या परिक्षेतही चांगले गुण मिळवले होते.

वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू असताना लेकीनं मिळवलेल्या यशाबद्दल शरद पोंक्षे यांना कौतुक होतं. त्यावेळी त्यांनी खास पोस्ट शेअर केली होती.
त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की,’२०१९ माझे कर्करोगावरील ऊपचार चालू असताना, हाॅस्पिटलमधे येऊन काॅलेज अभ्यास करून एवढ्या टेंशनमधे असतानाही पिल्लून ८७%मार्क १२ विज्ञान शाखेत मिळवले अभिमान वाटला मला, व सतत वाईट बातम्या चहूबाजूनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here