गेल्या महिनाभरापासून चलन बाजारात रुपयाची होरपळ सुरु आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून गुंतवणूक काढून घेतल्याने रुपयाची होरपळ सुरुच आहे.

हायलाइट्स:
- डॉलरसमोर रुपयाचे २२ पैशांचे अवमूल्यन झाले.
- तो ७९.४८ या नव्या नीचांकी पातळीवर स्थिरावला.
- केंद्र सरकारसमोर नवं संकट उभं राहिल आहे.
सोने-चांदीमधील घसरण सुरुच; आणखी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर
रुपयात मागील महिनाभरात प्रचंड अवमूल्यन झाले आहे. रुपया ८० च्या उंबरठ्यावर आहे. यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, मोबाईल फोन, टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर चिप आदी महाग होण्याची शक्यता आहे.
ITR भरण्याचे ५ मोठे फायदे;तुमच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं का फायदेशीर, जाणून घ्या
भांडवली बाजारात शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १०९ कोटींचे शेअर विक्री केले होते. जुलै महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून ४,००० कोटी काढून घेतले आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्यानंतर अमेरिकेत बॉंड यिल्डमध्ये वाढ झाली आहे. परिणामी परदेशी गुंतवणूकदार बॉंडमध्ये गुंतवणूक करत आहेत.
जोडोनिया कर ; प्राप्तिकर विवरणपत्र भरताना…
आज डॉलर इंडेक्स १०७.६० वर गेला. शुक्रवारी रुपया ७९.२६ वर बंद झाला होता. आज त्यात आणखी घसरण झाली. इंट्रा डे मध्ये रुपयाने ७९.४९ चा नीचांकी स्तर गाठला होता.दिवसअखेर तो ७९. ४८ वर स्थिरावला. आयातीचा खर्च वाढल्यास तूट नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. परिणामी सरकारला कल्याणकारी योजनांच्या अनुदानाला कात्री लावावी लागेल.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : rupees depreciate all time low
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network