पुणे:भीमाशंकर परिसरात पर्यटनासाठी उल्हासनगर येथून सहा पर्यटक आले होते. मात्र, येथे मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्याने ते सहा युवक भीमाशंकर परिसरातील खोल दरीत रात्रीच्या सुमारास अडकून पडले होते. याबाबत पोलिसांना अलर्ट मिळाल्यानंतर घोडेगाव पोलिसांनी आणि परिसरातील स्थानिक युवकांनी भर पावसात (Maharashtra Monsoon 2022) आणि धुक्यात जाऊन त्या सहा युवकांची सुटका केली आहे.

पवन अरुण प्रताप सिंग (वय २६), सर्वेश श्रीनिवास जाधव (वय २६), निरज रामराज जाधव (वय २८), दिनेश धर्मराज यादव (वय २३), हितेश श्रीनिवासी यादव (वय २५), अंकुश सत्यप्रकाश तिवारी (वय २३) अशी या सहा तरुणांची नावं आहेत. हे सर्व उल्हासनगर येथे राहणारे आहेत.

हेही वाचा –Maharashtra Monsoon 2022 : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार; ५ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

सहा तरुणांनी मुंबईजवळ (Mumbai) असणाऱ्या मुरमाडच्या जंगलातून भीमाशंकरच्या (Bhimashankar) दिशेने चालण्यास सुरुवात केली. २० ते २५ किमी अंतर चालल्यानंतर पावसाचा जोर आणि धुके आणखी दाट झाले. त्यात सायंकाळचे ५ वाजून गेले असल्याने अंधारही पडू लागला होता. त्यामुळे पुढचा रस्ताही दिसेनासा झाला. ते ६ जण घाबरून गेले होते. मात्र, मोबाईलला रेंज असल्याने त्या युवकांनी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला, त्यांना घटना स्थळाचे लोकेशन पाठवले. त्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांनी पोलिसांनी संपर्क करून याबाबत माहिती दिली.

six tourists stuck in bhimashankar jungle

भीमाशंकर जंगलात अडकलेल्या सहा तरुणांची सुटका

पोलिसांनी अधिक माहिती घेत त्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र, पाऊस आणि धुक्यामुळे पुढचं काहीच दिसत नव्हतं. पोलिसांनी स्थानिक युवकांना हाताशी धरून ते घटनास्थळ शोधून काढले. मात्र, तिथे जाणं तसं अवघड होतं. दोरीच्या सहाय्याने या तरुणांना पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश मिळवले.

हेही वाचा –अतिवृष्टीमुळे नदीला पूर, विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे भाविक अडकले; नदी पलीकडेच केले भजन

पोलिसांनी सायंकाळी सात वाजता सुरू केलेली मोहीम अखेर रात्री बारा वाजता संपली. घोडगावाचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि त्यांच्या टीमने तत्परता दाखवत ही चार तास चाललेली मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.

त्या चार तासात आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला काही सुचेनासे झाले होते. कारण सगळीकडून अंधार, मुसळधार पाऊस, दाट धुके यामुळे आता आमचं काही खरं नाही, असं वाटलं. मात्र, पोलिसांच्या आणि स्थानिकांच्या मदतीमुळे आम्हाला जीवनदान मिळाल्याच्या भावना त्या पर्यटकांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा –Nashik Rain : नाशिकला रेड अलर्ट; गंगापूर धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

विकेंडला भुशी डॅम, लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंटला पर्यटकांची गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here