जळगाव: खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेली आरोपी महिला करोनाच्या प्रादुर्भावामुळे रजेवर नाशिक कारागृहातून पडली. मात्र पुन्हा कारागृहात दाखल न होता महिला फरार झाली होती. या फरार झालेल्या महिलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (११ जुलै) सकाळी ९ वाजता भडगाव तालुक्यातील टोणगाव येथून अटक केली आहे. निर्मलाबाई अशोक पवार (रा. टोणगाव ता. भडगाव) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव पोलीस ठाण्यात २०११ मध्ये दाखल खूनाच्या गुन्ह्यातील निर्मलाबाई अशोक पवार या महिला आरोपीला मालेगाव न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. ती नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना शासनाच्या आदेशान्वये करोना प्रादुर्भावमुळे बंदी कैद्यांची ४ जुन २०२२ पर्यंत रजेवर सोडण्यात आले होते. दरम्यान, दिलेल्या रजेच्या मुदतीत महिला आरोपी ही नाशिक जेलमध्ये हजर न झाल्याने तिला फरार घोषीत करण्यात आले.
मी आजीला ठार केलंय, बघून घ्या! मित्रांना व्हिडीओ कॉल करून त्यानं मृतदेह दाखवला अन् मग…
महिला आरोपी ही तिच्या गावात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पोलीस अंमलदार, लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, विनोद पाटील, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रत्ना मराठे, उपाली खरे, राजेंद्र पवार यांनी यांच्या पथकाने महिलेला तिच्या टोणगाव या गावातून सोमवारी सकाळी ९ गावातून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी महिलेला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अरे रिक्षा आहे की बस? तब्बल २७ प्रवासी बाहेर पडले; मोजता मोजता पोलीस चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here