डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी यादवनगर भागातील भीम चौकात भेट दिली. त्यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलात शालेय मुलांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षा अडकून पडलेली त्यांना दिसली. त्यानंतर राऊत यांनी कारमधून खाली उतरून ऑटोरिक्षावाल्याला मदतीचा हात दिला.

ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या उत्तर नागपूर मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात जनतेच्या अडीअडचणी समजून घेवून त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होत आहेत. मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा आज आढावा घेत असतानाच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते सामील झाले आहेत.
डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी यादवनगर भागातील भीम चौकात भेट दिली. त्यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलात शालेय मुलांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षा अडकून पडलेली त्यांना दिसली. त्यानंतर राऊत यांनी कारमधून खाली उतरून ऑटोरिक्षावाल्याला मदतीचा हात दिला. इतकेच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत स्वतः ऑटोरिक्षाला धक्का देऊन ती चिखलातून बाहेर काढली.
चक्क स्थानिक आमदार आणि राज्याचे माजी ऊर्जा मंत्री ऑटोला धक्का देत आहेत हे पाहून परिसरातील लोकही आश्यर्यचकित झाले. रिक्षा पुन्हा धावू लागताच ऑटोरिक्षातील विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हसू पाहून डॉ. राऊत यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network