ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. उल्हास नदीसह जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. दुसरीकडे प्रशासनाने धबधबे आणि नद्यांच्या पर्यटन स्थळांवर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. तरीही नागरिकांची गर्दी होत आहे. आता कल्याणजवळ मलंगगड नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

 

two youths drowned in malanggad river kalyan
डोंबिवलीच्या दोन तरुणांचा मृत्यू, कल्याणजवळ मलंगगड नदीत बुडाले
कल्याण : मलंगगड परिसरात दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आंभे गावाजवळील नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंभे गावाजवळून वाहणाऱ्या नदीची पातळी वाढली आहे. डोंबिवलीहून १२ जणांचा एक ग्रुप आज या परिसरात पिकनिकसाठी आला होता. यावेळी आंभे गावाजवळ नदीत हे तरुण पोहण्यासाठी उतरले. मात्र त्यांना नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने यापैकी अंकित जयस्वाल आणि निखिल कनोजिया हे दोन १७ वर्षीय तरुण नदीत बुडाले. यावेळी स्थानिकांनी तिथे धाव घेत या तरुणांचा शोध घेतला. या दोघांचेही मृतदेह आढळून आले.

मलंगगड परिसरात गेल्या वर्षी पावसाळ्यात नदीत बुडून ६ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच २ तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. दरम्यान, अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर तहसीलदारांनी ३१ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू केला आहेत. मनाई असतानाही हा ग्रुप या परिसरात कसा आला? त्यांना पोलिसांनी अडवलं कसं नाही? असा प्रश्न यानंतर उपस्थित करण्यात येत आहे.

चिखलोली धरणावर सुट्टीचा आनंद मिळवण्यासाठी गेला तरुण; पुढे घडले ते धक्कादायक

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : two youths drowned in malanggad river kalyan
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here