मुंबई:मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट अनेकदा चर्चेत असतात. राजकीय विषय असो किंवा वैयक्तिक , त्यांच्या पोस्टवर सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.

दरम्यान, किरण माने यांची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट त्यांच्या जुन्या पोस्टसंदर्भात आहे.

किरण माने यांच्या पोस्ट अनेकदा व्हायरल होतात. अनेकदा बातमीदार देखील त्याची दखल घेतात. किरण मानेंच्या पोस्टची एका वेबसाइटनं दखल घेतली. परंतु त्या बातमीचा मथळा मूळ पोस्टपेक्षा दिशाभूल करणारा काहीसा वेगळा होता.याच संदर्भात किरण मानेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने

पत्रकारितेच्या नावानं चांगभलं ! मी सतीश तारेच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त केलेल्या पोस्टची बातमी कशी केलीय बघा. असो. आमच्या सुखदु:खात दिशाभूल करुन करून तुमचं पोट चालतंय ना? मग आनंद आहे. फिकर नॉट. अशी ही पोस्ट आहे.

काय होती किरण मानेंची पोस्ट?

पोस्ट

किरण माने हे नाव ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे विशेष चर्चेत आले. या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर त्यांना मालिका सोडावी लागल्याचेही प्रकरण विशेष गाजले होते. राजकीय भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असा आरोप किरण यांनी केला होता. त्याच एकंदरित परिस्थितीची सल अजूनही त्यांच्या मनात असल्याने किरण यांची अलीकडचे पोस्ट वाचून जाणवते.

11 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here