अमरावतीत एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. १७ वर्षीय अल्पवयीन युवकाची हत्या गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या केसरबाई लाहोटी विद्यालयासमोर झाली.

घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले घटनास्थळी दाखल झाले तर घटनेचे गांभीर्य बघून अमरावती परिक्षेत्र मंडळ दोनचे पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. सदर हत्या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ एक पथक गठीत केले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network