मुंबई : आपले आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले असले तर ते मनाने शिवसेनेचेच आहेत. येणाऱ्या काळात आपण एकनाथ भाई आणि भाजपशी जुळवून घ्या, अशी विनंती शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणीही बहुतांश खासदारांनी केली, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची ‘मातोश्री’ येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला १३ खासदार उपस्थित होते तर ५ खासदारांनी दांडी मारली होती. दुपारी १ वाजता सुरु झालेली बैठक तब्बल साडे सहा वाजता संपली. साडे पाच तासांच्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक खासदाराचं म्हणणं ऐकून घेतलं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा यावरही सेना खासदार आणि पक्षप्रमुखांमध्ये विचारमंथन झालं. याच बैठकीचा तपशील संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितला.

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा? राऊतांचे संकेत

“आजच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. द्रौपदी मुर्मू आदिवासी महिला आहेत. त्यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली. तसेच यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यावरही चर्चा झाली. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत. शेषन, प्रणब मुखर्जी, प्रतिभा पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आताही चर्चा झाली आहे. निर्णय घेण्याचा सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले आहेत”, असं राऊत म्हणाले.

जो पक्ष आणि पक्षप्रमुखांचा निर्णय, त्याच्यासोबत संजय राऊत, खासदारांच्या बैठकीनंतर भूमिका
मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत खासदारांचा आग्रह झाल्याने राऊत नाराज होऊन बैठकीतून बाहेर पडल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं. त्यावर खुलासा करताना राऊत म्हणाले, “जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो त्याच्यासोबत संजय राऊत असतात. राऊत नाराज अशा बातम्या जे कुणी चालवत आहेत, ते मुर्ख आहेत. अशा बातम्या देऊ नका, अफवा पसरवू नका, अशं आवाहन करताना पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, सर्व खासदार त्यांच्या मागे उभा राहतील”, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

‘उद्धव ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा’, शिवसैनिकांकडून बॉण्डवर नोटरी केलेलं प्रतिज्ञापत्र
५ खासदारांची दांडी

संजय राऊत म्हणाले, “संजय जाधव आजारी असल्याने बैठकीला आले नाहीत. हेमंत पाटील पोहोचू शकले नाहीत. गुजरातमध्ये तुफान पाऊस असल्यामुळे कलाबेन डेलकर यांना येता आलं नाही. तर भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही”, असं राऊत यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here