Eknath Shinde camp Shivsena rebel MLA’s | एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर ते सूरतमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सूरतमधील ले मेरेडियन हॉटेलमध्ये मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना पाठवले होते. त्यावेळी रवींद्र फाटक यांनीच एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर रवींद्र फाटक हेच शिंदे गटात सामील झाले होते.

 

Uddhav Thackeray Sanjay Raut (1)
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत

हायलाइट्स:

  • हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन संतोष बांगर यांची हकालपट्टी
  • सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी
  • पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचीही उचलबांगडी
मुंबई: बंडखोरांनी अजूनही परत यावे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असे आवाहन सातत्याने करणाऱ्या शिवसेनेने दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde camp) बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून दररोज एक-एक पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली जात आहे. यामध्ये मंगळवारी आणखी एका बंडखोराची भर पडली. शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांची पालघर जिल्हासंपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर ते सूरतमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सूरतमधील ले मेरेडियन हॉटेलमध्ये मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना पाठवले होते. त्यावेळी रवींद्र फाटक यांनीच एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर रवींद्र फाटक हेच शिंदे गटात सामील झाले होते. रवींद्र फाटक हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.
तुला कोणी हटवू शकत नाही, ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या बांगरांना शिंदेंकडून दिलासा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन संतोष बांगर यांची हकालपट्टी केली होती. त्यापूर्वी सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती. याशिवाय, शिवसेनेने कोकणातील आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांच्या समर्थकांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले होते.
मंत्रिपद कोणाला नको? माझ्यात पुन्हा दहा हत्तींचं बळ येईल, संतोष बांगर यांचं शक्तिप्रदर्शन
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून दररोज कोणाकोणाची हकालपट्टी झाली, याची माहिती प्रसिद्ध केली जात आहे. मात्र, बंडखोर आमदारांनी याविरोधात दंड थोपटायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कारवाईला थेट आव्हान दिले होते. मला हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मीच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो आणि राहणार, असा पवित्रा संतोष बांगर (Santosh Banger) यांनी घेतला आहे. दोन तृतीयांश आमदार असलेला शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून माझ्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आमच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) ५० जिल्हाप्रमुख आहेत, असे संतोष बांगर यांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shiv sena supremo uddhav thackeray sacked one more mla from eknath shinde camp action take against ravindra phatak and rajesh shah
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here