त्या दोघांचे लग्न झाले. नंतर कळले की पत्नी सहा महिन्यांची गर्भवती आहे. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधांमधून गर्भधारणा झालेली असूनसुद्धा लग्न करणाऱ्या ही महिला

 

marriage
सात वर्षांनंतर गुन्हा दाखल

म.टा. प्रतिनिधी, नागपूरः
त्या दोघांचे लग्न झाले. नंतर कळले की पत्नी सहा महिन्यांची गर्भवती आहे. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधांमधून गर्भधारणा झालेली असूनसुद्धा लग्न करणाऱ्या ही महिला, तिचा प्रियकर आणि तिच्या माहेरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ डिसेंबर २०१४ ते ९ मार्च २०१५ या काळात घडली. सात वर्षांनंतर यात पतीला न्याय मिळाला.

रोशन जयंत बिबे (वय ३२, रा. योगी अरविंदनगर) असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. सरिता गणपत काळे (वय २८), नंदा गणपत काळे, (वय ३९), प्रवीण वसंतराव राउडकर (वय ४०) आणि संजय सातपुते (वय ३५, सर्व रा. पांढुर्णा, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी रोशनचे सरितासोबत लग्न लावून दिले. काही काळानंतरच रोशनच्या लक्षात आले की, सरिता सहा महिन्यांची गर्भवती आहे. तिचे आरोपी संजयसोबत प्रेमसंबंध होते. त्याच्यापासून तिला गर्भधारणा झाल्याचे समोर आले. पुढे सरिता रोशनच्या घरातील सगळे दागिने घेऊन पळून नेली. त्यानंतर तिने छिंदवाडा येथील कौटुंबिक न्यायालयात खावटीचे खोटे प्रकरण दाखल केले. खटला सुरू असतानाच तिने संजयसोबत लग्न केले. आज त्याच्याकडून तिला ७ वर्षांची मुलगी आहे.

दरम्यान, रोशननेही न्यायालयात धाव घेतली व ही परिस्थिती न्यायालयापुढे आणली. यावर न्यायालयाने सर्वच आरोपींवर फस‌वणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : after marriage, he found out that his wife was six months pregnant in nagpur
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here