शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे. शिवसेना राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देईल, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

हायलाइट्स:
- शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा?
- संजय राऊतांचे संकेत
- मुर्मूंना पाठिंबा म्हणजे भाजपला नव्हे
राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना बंधनकारक आहे, असं संजय राऊत म्हणाले. खासदारांच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि भावना गवळी उपस्थित नव्हते, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यात मुंबईला ऑरेंज तर ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, ‘या’ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
खोट्या बातम्या पसरवण्यासाठी यंत्रणा काम करते, असं संजय राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आमचं देखील लक्ष लागलं होतं. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी घटनापीठ स्थापन करणार असल्याच सांगितलं. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी घटनापीठ स्थापन करणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष गांभीर्यानं घेतला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
रिझर्व्ह बँंक हतबल! डॉलरपुढे रुपयाचे लोटांगण, चलनाचे मूल्य सार्वकालीन नीचांकाला
एकनाथ शिंदे यांच्या गटाला एनडीएनं राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भातील बैठकीसाठी निमंत्रण मिळालं आहे. दीपक केसरकर दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं असता संजय राऊत यांनी आम्ही या सर्व गोष्टींकडे तटस्थपणे पाहतो, असं संजय राऊत म्हणाले.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार? सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम सुनावणी, संपूर्ण राज्याचं लक्ष
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network