Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 12, 2022, 12:07 PM
Assam Flood 2022: एकीकडे देशभरात मुसळधार पाऊस सुरू असताना एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भगवान विष्णू क्षीरसागरात विराजमान असल्याचं दिसत आहेत.

वाचाः अनोळखी व्यक्तींना घरात घेताना सावधान; बीडमध्ये पती-पत्नीवर ओढावला भयंकर प्रसंग
श्रीमन् नारायण नारायण हरि हरि हे गाणं असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ब्रह्मपुत्री नदीच्या किनारी चकेश्वर मंदिरात भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीच्या या अलौकिक रुपाचे दर्शन घडते. पण या फोटोमागचे खरे कारण वेगळेच आहे. क्षीरसागराचे हे दृश्य एका पिलरच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहे. या पिलरच्यावर शेषनाग आणि त्यावर भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीची मूर्ती बसवण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळं जेव्हा ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते तेव्हा क्षीरसागराच्या मूर्तीच्या खालील भाग संपूर्ण पाण्याखाली जातो त्यामुळं भाविकांना भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर निद्रिस्त अवस्थेत असलेले दृश्य नजरेस पडते. नवीन कुमार जिंदल यांनी ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावरील भगवान विष्णुचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
वाचाः नाशिकमध्ये एका दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस; पावसाने मोडला पाच वर्षांचा रेकॉर्ड

वाचाः ‘या’ जिल्ह्यात नोव्हेंबरअखेरपर्यंत ट्रेकिंगसह मुक्कामाला मनाई, अशा आहेत सूचना
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network