मुंबई : गेले काही दिवस लीना मणिमेकलाई आणि तिच्या काली सिनेमाचं पोस्टर प्रचंड वादात अडकलं आहे. लीनाच्या समोरच्या अडचणी संपायचं नावच घेत नाहीत. आता या वादात द काश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही उडी घेतली आहे. अग्निहोत्रींनी लीनाला वेडी म्हटलं आहे. काली पोस्टर प्रकरणी लीनाच्या विरोधात एफआरआय दाखल झालाय. दिल्लीच्या एका कोर्टानं तिला ६ ऑगस्टला हजर व्हायचे आदेश दिले आहे. यात विवेक अग्निहोत्री यांनी नवं ट्वीट केलं आहे.

घटस्फोटाच्या आदल्या रात्री घरच्यांनी मला… मलायकानं पहिल्यांदाच सांगितलं खरं काय घडलं

लीना मणिमेकलाईच्या या विधानावर अग्निहोत्रींचं वक्तव्य
विवेक अग्निहोत्री यांनी लीनाच्या काली पोस्टर समर्थनाच्या ट्वीटला रीट्रीट केलं आहे. यात लीना म्हणाली होती, ‘माझी काली अनोखी आहे. ती एक स्वतंत्र आत्मा आहे. ती पितृसत्ताक पद्धतीवर थुकते. ती हिंदुत्वाला तोडून टाकते. ती भांडवलशाही नष्ट करते आणि प्रत्येकाला आपल्या हजारो हातांनी जवळ करते.’

अग्निहोत्रींचं ट्वीट

विवेक म्हणाले, कोणी या वेड्यांना संपवू शकेल का?
लीनाच्या ट्वीटला रीट्वीट करत विवेक अग्निहोत्री म्हणाले, ‘कोणी या वेड्यांना संपवू शकतं का? प्लीज…’ सोबत त्यांनी विनोदी इमोजी टाकली आहे. अनुप जलोटा यांनीही लीनाबद्दल असंच म्हटलं होतं. ते म्हणाले होते, तिला वेड्यांच्या हाॅस्पिटलमध्ये पाठवा. ही स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा मार्ग आहे.

वहिनीसाहेब आता खडूस नणंदेच्या रूपात, धनश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहा

लीनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिनं ट्वीट करत आपलं मत मांडलं. तिनं ट्विटमध्ये लिहिलं आहे की,’माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. जे लोक बेधडकपणे, निडरपणे बोलतात त्यांच्यासाठीच मी कायम आवाज उठवीन. जर त्यासाठी माझं आयुष्य जरी द्यावं लागलं तरी मी देईन….’ लीनानं सांगितलं होतं की, तिची हा माहितीपट टोरँटोमधील आगा खान म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘रिदम ऑफ कनाडा’ मध्ये दाखवला होता.

‘काली’च्या पोस्टरवर भडकल्या तृप्ती देसाई, कारवाईची केली मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here