आई आणि आजीनं ३ वर्षांच्या मुलीला जमिनीत गाडलं. त्यानंतर पुरावे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. जमिनीत गाडण्यापूर्वी दोघींनी चिमुरडीला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. मुलीचा मृत्यू झाल्याचं समजून दोघींनी तिला जमिनीत गाडलं. मात्र जमिनीत गाडली जाऊनही ३ वर्षांची मुलगी वाचली.

 

chapra
३ वर्षांच्या मुलीला जमिनीत जिवंत गाडलं

हायलाइट्स:

  • तीन वर्षांच्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न
  • आई आणि आजी मुलीच्या जीवावर उठल्या
  • सुदैवानं चिमुरडी वाचली; कुटुंबाचा शोध सुरू
छपरा: बिहारच्या छपरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आईनं पोटच्या लेकीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आई आणि आजीनं ३ वर्षांच्या मुलीला जमिनीत गाडलं. त्यानंतर पुरावे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. जमिनीत गाडण्यापूर्वी दोघींनी चिमुरडीला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. मुलीचा मृत्यू झाल्याचं समजून दोघींनी तिला जमिनीत गाडलं. मात्र जमिनीत गाडली जाऊनही ३ वर्षांची मुलगी वाचली.

छपरातील कोपा येथे ही घटना घडली. चिमुरडीच्या आई आणि आजीनं तिचा गळा दाबला. त्यानंतर तिला जमिनीत गाडलं. चिमुरडीनं आक्रोश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आईनं तिच्या तोंडात माती कोंबली.आई आणि आजीनं चिमुकल्या मुलीला कोपा येथील मरहा नदीच्या तिरावर असलेल्या कब्रस्तानात गाडलं. थोड्याच वेळानंतर त्या परिसरात काही महिला लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना एका भागात माती हलताना दिसली. जमिनीच्या आतून हुंदक्यांचा आवाज येत होता.
‘तुझ्यासमोर १० पुरुषांशी शरीर संबंध ठेवेन’; पत्नीच्या धमकीनंतर पतीनं उचललं टोकाचं पाऊल
लाकडं गोळा करण्यासाठी कब्रस्तानात गेलेल्या महिला घाबरल्या. भूत-भूत म्हणत त्या ओरडू लागल्या. यानंतर स्थानिक गोळा झाले. त्यांनी तिथे खोदकाम सुरू केलं. त्यावेळी त्यांना ३ वर्षांची मुलगी जिवंत सापडली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. ग्रामस्थांनी चिमुरडीला पाणी दिलं. चिमुरडी अवस्थेत होती. पोलिसांनी तिला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
मी आजीला ठार केलंय, बघून घ्या! मित्रांना व्हिडीओ कॉल करून त्यानं मृतदेह दाखवला अन् मग…
आपलं नाव लाली असल्याचं चिमुरडीनं पोलिसांना सांगितलं. मात्र तिला तिच्या गावाचं नाव सांगता आलं नाही. आई आणि आजीनं तिच्यासोबत केलेला प्रकार तिनं पोलिसांना सांगितला. कोपा पोलीस चिमुरड्या मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : frightened by shaking lose soil at cemetery, women recover living 3 year old
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here