मुंबई: बॉलिवूडमध्ये ‘दीपवीर’ म्हणून प्रसिद्ध असणारं जोडपं ‘दीपिका पादुकोण’ आणि ‘रणवीर सिंग’ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या कपलचे अनेक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. दरम्यान दीपिका आणि रणवीर दोघेही अनेकदा एकमेकांबाबत भरभरुन बोलताना दिसले आहेत. अलीकडेच रणवीरने त्याचा ३७वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याच्या वाढदिवसासाठी ही जोडी यूएसमध्ये होती. दीपिका आणि रणवीर यांनी ॲडव्हेंचर ट्रिप करत वाढदिवस साजरा (Ranveer Singh Birthday Celebration) केला. दरम्यान दोघांनीही भारतात परतल्यानंतर या ट्रिपमधील भन्नाट व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

हे वाचा-कतरिना कैफ प्रेग्नंट ? नेटकऱ्यांनी लावला असा अंदाज की तुम्हालाही वाटेल खरं

या प्रवासातील खूपच सुंदर फोटो दीपिका आणि रणवीर यांनी पोस्ट केले आहेत. या दोघांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसतंय की त्यांनी सायकल स्वारीचा आनंद घेतला आहे तर जंगलामध्ये ट्रेकिंग केलं आहे. याशिवाय रणवीर एका व्हिडिओमध्ये खोल पाण्यात डुबकी मारताना दिसतो.


जंगलातील एका व्हिडिओत रणवीर दीपिकाची गंमत करताना म्हणतो की, ‘दीपिका vs वाइल्ड’मध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थात रणवीरच्या आयुष्याचील साहस काही संपत नाही आहे, कारण याआधी तो नेटफ्लिक्सच्या ‘रणवीर vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या शोमध्ये दिसला होता. आता तो त्याच्या लाइफ पार्टनरसह अशाप्रकारचं साहस करताना दिसतोय.

हे वाचा-घटस्फोटाच्या आदल्या रात्री घरच्यांनी मला… मलायकानं पहिल्यांदाच सांगितलं खरं काय घडलं

दीपिका-रणवीरने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये समुद्रही दिसतो आहे. अर्थात या जोडीने निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला एवढं मात्र नक्की. रणवीरने शेअर केलेल्या फोटोंना त्याने अशी कॅप्शन दिली आहे, ‘तुझ्यावर प्रेम करायला आवडते’. तर दीपिका म्हणतेय की, ‘आपले जीवन भरपूर अनुभव आणि साहसांनी परिपूर्ण व्हावे अशीच इच्छा आहे’.

दरम्यान रणवीर-दीपिकाने शेअर केलेल्या फोटोंमधील एक गोष्ट चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही. रणवीरने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये त्याच्या काखेतील केस दिसत आहेत. नेटकऱ्यांनी यावरुन त्याला शेव्हिंग करण्याचा सल्ला दिला आहे. ‘काखेत केस दिसतायंत’, ‘कितीही उशीर झाला असेल तरी अंडरआर्म्स शेव्ह करून निघायचं भावा’, ‘चाचा अंडरआर्म्स तरी शेव्ह करायचे’ इ. अशा कमेंट्स रणवीरच्या फोटवर आल्या आहेत.

Ranveer Singh Deepika Padukone

सोमवारी सकाळी रणवीर-दीपिका मुंबईत परतले. त्यावेळी त्यांचा एअरपोर्टवरील व्हिडिओही समोर आला होता. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत या दोघांनी एक आठवड्याची सुट्टी एंजॉय केली आहे. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दीपिका लवकरच शाहरुख खानसह ‘पठाण’ सिनेमात दिसणार आहे. यामध्ये जॉन अब्राहम देखील असेल. तर रणवीर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये आलिया भट्टसह स्क्रीन शेअर करणार आहे. अलीकडेच तो आलियासह ‘कॉफी विथ करण’मध्येही पोहोचला होता. रणवीरचा ‘सर्कस’देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here