मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी त्याच्याविरोधात ‘परदेशात भारताची प्रतिमा मलिन’ करण्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्याचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होतोय.

वीर दासचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओतील त्याच्या वक्तव्यामुळं देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. व्हिडिओत वीर दास म्हणतोय की, आपल्या देशात एका कॉमेडियनला कधीही कानशिलात लगावली जाऊ शकते. लोक ती कोणी लगावली हे विचारत नाही, तर का लगावली असा प्रश्न करतात. देशद्रोह, लोकांच्या भावना दुखावल्या, अवमान झाला…असं म्हणत कुणीही कोणाच्या कानाखाली मारू शकतो, असं वीर दास त्याच्या व्हिडिओ म्हणताना दिसतोय.
कतरिना कैफ प्रेग्नंट ? नेटकऱ्यांनी लावला असा अंदाज की तुम्हालाही वाटेल खरं
दरम्यान काही महिन्यांपूर्वी देखील वीर दासच्या व्हिडिओमुळं वाद निर्माण झाला होता.

काय होता हा वाद?
कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यानं अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसीमध्ये स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात ‘टू इंडियाज’ नावानं एक कविता वाचून दाखवली होती. त्याच्या कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कवितेतली ‘मी त्या भारतातून येतो, जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री सामूहिक बलात्कार’ अशी एक ओळ वादात अडकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here