jalgaon news today marathi, निर्दयीपणाचा कळस! स्कॉर्पिओचा दरवाजा उघडताच सगळे हादरले, पोलिसांची मोठी कारवाई – cattle transport from scorpio jalgon police action release five cows
जळगाव : जळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खरंतर, पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी गुरांची वाहतूक करण्यासाठी नवनवीन वाहनांचा वापर करण्यासह शक्कल लढविल्या जात असतात. अशाच प्रकारे जळगाव शहरात चक्क स्कॉर्पिओमधून गुरांची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ या वाहनावर सोमवारी रात्री शहर पोलिसांनी कारवाई केली असून या वाहनातून कोंबण्यात नेण्यात आणणाऱ्या ५ गायींची मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी: भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या, धक्कादायक कारण समोर जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळून एम.एच. ११ ए.के.६००९ या क्रमाकांच्या स्कॉर्पिओतून गुरांना कोंबून त्याची वाहतूक केली जात असल्याची पोलीस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे, योगेश इंधाटे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. याठिकाणी गुरांनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता.