रसभरी
अभिनेत्री स्वरा भास्करची महत्त्वाची भूमिका असलेली कॉमेडी-ड्रामा रसभरी ही सीरिज. या सीरिजची प्रचंड चर्चा झाली. नेहमीप्रमाणे स्वरा भास्करचा अभिनय कमालीचा झाला आहे. सीरिजसाठी लोकेशनही समर्पक निवडण्यात आली आहेत. छोट्या शहरातील बारीकसारीक गोष्टी टिपण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. पण या सीरिजमध्ये स्वरा शिक्षीकेच्या भूमिकेत आहे. त्यामुळं तिच्या मादक सीनवर प्रेक्षकांना आक्षेप घेतला होता.
मस्तराम
‘मस्तराम’ ही सीरिजही चर्चेत होती. या सीरिजची कथा ही साध्या मुलाची गोष्ट आहे. पण बोल्ड वेब सीरिज या कॅटेगिरीत या सीरिजचा समावेश होतो. लेखक व्हायचं स्वप्न असलेल्या एका तरुणाची कथा आहे. लेखक म्हणून काही तरी वेगळं करण्याच्या नादात तो बोल्ड मासिकासाठी लिहू लागतो . त्याचा प्रवास या सीरिजमध्ये पाहायला मिळेल
मिर्झापूर१ अणि २
मिर्झापूर या सीरिजचा आता तिसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरिजचे दोन्ही सीझन प्रचंड हीट झाले होते.
या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्सचा तडका तर आहेच. पण नात्यांमधील गुंताही आहे. सून आणि सासरा यांच्यातील नातेसंबंध, त्याच्यांतले बोल्ड सीन आणि संवाद आहेत.
अनसेंसर्ड
२०१८मध्ये ऑल्ट बालाजीवर ही सीरिज लॉन्च झाली आहे. या सीरिजमध्ये प्रचंड बोल्डनेस असून शंतनू माहेश्वरी, अंकित गेरा, ऋत्विक धनजानी मुख्य भूमिकेत आहेत.
गंदी बात
ऑल्ट बालाजीवर प्रदर्शित झालेली ही सीरिज आहे. यात अनेक बोल्ड सीन्स आहेत. त्याची चर्चाही झाली होती. ही वेब सीरिज फक्त प्रौढांसाठी आहे.